🌸
Makar Sankranti 2019: मकरसंक्रांत हा भारतातील एक शेतीसंबंधित सण आहे. सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.
🌸
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (१३ जानेवारी), संक्रांत (१४ जानेवारी) आणि किंक्रांती (१५ जानेवारी) अशी नावे आहेत. संक्रांतीला आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाण वाटून `तिळगुळ घ्या आणि गोड बोला` असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्यासाठी शुभेच्छा देतात. विवाहित स्त्रिया या दिवशी हळदी-कुंकू करतात.
🌸
आली मकर संक्राती
नांदी नव्या युगाची
🌸
चला राहू नका मागे
चला या रे सारे आगे
संक्रमण करु या
मकराचा सूर्य सांगे
🌸
चला झटका जुन्याला
चला कवळा नव्याला
बदलत्या युगासंगे
करा Remix सारे
🌸
चला उडवा पतंग
चला उठवा तरंग
दोर हिंमतीचा
उंच जाऊ द्या रे
🌸
चला सोडा भांडण तंटे
चला फोडा द्वेषाचे भांडे
गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
🌸
घ्या,गोड तिळगुळ घ्या
बोला बोल प्रेमाचे
🌸
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
🌸
COPY PEST
Hindi Kavita, Kavita, Poem, Poems in Hindi, Hindi Articles, Latest News, News Articles in Hindi, poems,hindi poems,hindi likhavat,hindi kavita,hindi hasya kavita,hindi sher,chunav,politics,political vyangya,hindi blogs,hindi kavita blog
Tuesday, 15 January 2019
Happy makar sankarti
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment