*डॉ आनंद नाडकर्णी यांची पोस्ट* 👇🏻
कालपासून हिमांशू रॉय यांची दुर्दैवीआत्महत्या आणि दंगल सिनेमात गाजलेली अभिनेत्री झाइराचा अनेक वर्षे डिप्रेशनशी चाललेला लढा सर्व माध्यमातून चर्चिला जात आहे. पूर्वी दीपिका पदुकोणने ही असे जाहीर केले होते तेव्हा हा विषय पडद्यामागून बाहेर आला हे चांगले.
नेहेमी प्रमाणे मते-विधाने मांडून ही बातमी... नव्हे, ह्या मागचा ब्रह्मराक्षस विसरला जाऊ नये हा प्रयत्न *मैत्र हेल्पलाईन* करणार आहे.
*डिप्रेशन एक आजार आहे* जो अनेकदा बाहेरून दिसत नाही. सिनेमा आणि साहित्यात दिसणारे रडके उदास चित्र नेहेमी असते असे नाही. अनेकदा वरकरणी सारे ठीक आहे असे भासते आणि भासवले जाते... कारण कोणीतरी खिल्ली उडवेलं, रागवेल, समजून घेणार नाही, मनस्थितीचा फायदा घेईल असे वाटत राहते. आपले हसरे, दणकट, बिनधास्त बाह्यरुप कायम ठेवावे वाटते.. तसे न राहिले तर लाज वाटून सारे ठीक असल्याचे नाटक केले जाते.
अनेकदा आडून किंवा स्पष्ट सांगूनही जवळचे लोक नीट लक्ष देत नाहीत, नकळत किंवा वैतागून, नाहीतर व्यस्त असल्याने.
*मग जबरदस्त एकटेपणा जाणवतो. माझे कोणी नाही, आणि काहीही मार्ग नाही.. सुटका नाही.. उपयोग नाही: सतत अशा विचारांचा मारा होतो. मानसिक आणि शारीरिक शक्तीचा -हास होतो. मेंदूचा सारासार विचाराचा मार्ग बंद होतो.*
पुढची पायरी म्हणजे स्वतःला संपवण्याचे प्रयत्न.
ह्या सगळ्या गोष्टी काही अचानक होत नाहीत. काही दिवस- आठवडे- महिने जाऊ शकतात.
आपल्याला बरीच *संधी मिळत असते* हे बदलून वेगळा मार्गी चालण्याची.
कोणी येईल, हात धरून नेईल अशी *वाट पाहू नका. मदत घ्या- मनोविकार तज्ञ (सायकियात्रिस्ट) किंवा समुपदेशकाची; किंवा तुमच्या डॉक्टरांची तरी!!*
नाही तर *फोन उचला* आणि *मैत्रशी बोला*
नाव गाव न सांगता तुमचं दुःख सांगा. समस्येबद्दल बोला. आपण मार्ग काढू. निदान मैत्र आस्थेने ऐकेल.. समजून घेईल, धीर देईल हे नक्की!
भावनिक प्रथमोपचार घ्या :-
*मैत्र हेल्पलाईन*
*022-25385447*
*सोमवार ते शनिवार*
*सकाळी 9 ते रात्री 9*
*Maitra: Your Emotional First Aid*
🙏🏽एक विनंती: हा संदेश जास्तीत जास्त पसरावा.
एक मन...एक माणूस वाचवूया ! धन्यवाद.
- *मैत्र प्रकल्प समन्वयक*
*IPH, Thane*
No comments:
Post a Comment